श्रध्देची अंधश्रध्दा.....
आपण रस्त्यावरून जाताना पहातो... ( सध्यातरी असं म्हणता येईल की.... पहायचो ) कानाला मोबाईल लावून बोलता बोलता देऊळ दिसलं की बोलतच वाकून नमस्कार करणारी व्यक्ति , बस किंवा ईतर कुठल्याही वाहनातून जाताना देऊळ दिसलं की वाकून नमस्कार करणारा चालक किंवा प्रवासी , भरलेल्या पानाच्या तोब-याने ( दिसलं मंदीर की)ओठावरून कपाळाला २/४ वेळा स्पर्ष करणारा भक्त..... या सर्वांचा एकच समान धागा म्हणजे त्या विधात्यावर असलेली श्रध्दा..... विद्यार्थ्याची आपल्या गुरूवर असलेली श्रध्दा, पेशंटची डाॅक्टरवर असणारी श्रध्दा..... वगैरे वगैरे....
दोनएक
वर्षात त्याचा एका मित्राशी काहीच संपर्क नसताना , संपर्क नंबरही गहाळ झाला असताना खूप आठवण आल्यावर अगदी दुस-याच दिवशी त्या मित्राचा अचानक फोन येणे.... म्हणजे या देहाचे त्या
देहापर्यंत पोहोचणे.. ही अंधश्रध्दा....
दोघांच्या
घरगुती चर्चेत एखाघ्या मुद्द्यावर दरवाजावरील बेल वाजल्यावर ,सत्य आहे की नाही??मी
सांगतच होतो/होते , ही अंधश्रध्दा....
गेल्याच
आठवड्यातील गोष्ट.... तो खूप दिवसांनी
घराबाहेर पडला होता... ईमारती समोरील जवळपास सर्व रस्त्यांवर नविन पेव्हर ब्लाॅक बदलण्याचे काम या काळातही धडाक्यात
सुरू होते.... याच्या ईमारती बाहेर असलेल्या महानगरपालीकेच्या विभाग कार्यालयाबाहेरील पदपथ मात्र ओबडधोबड....खड्डेमय.... पेव्हर ब्लाॅक तुटलेले ... याच्या मनात विचार आला , दिव्याखालीच अंधार आहे.... कोणास तरी , अधिका-यास , एक दोन दिवसात
प्रत्यक्ष भेटणेच जरूरीचे आहे (सध्याच्या परिस्थितीला घाबरून घराबाहेर
जास्त न पडणारा तो
)हे ठरवून तो घरी आला......
दुसरा दिवस सुट्टी असल्याने फक्त विचारातच निघून गेला.... आणि तिस-या दिवशी काय
आश्चर्य.... त्या कार्यालयाबाहेर त्याच्या
इमारती बाहेर विविध प्रकारची वाहने आली, रस्ता उखडू लागला , रॅबीट जाऊ लागलं, रेती वगैरे माल आला आणि ४/५ दिवसात
कायापालट झाला .... चकाचक नविन पदपथ झाला.... या
मनाची ईच्छा त्या न पाहीलेल्या मनापर्यंत
पोहोचणे... ही त्याची अंधश्रध्दा....
कार्यालयाबाहेरीलच व समोरील रस्त्यावरील
एक पदपथ अजूनही खणलेल्या अवस्थेत... डागडुजीची वाट पहात...
अशीच आणखी एक घटना...... अनपेक्षितपणे घडलेली....
त्याच्या
मामाने नववर्षी / वाढदिवशी दिलेली सुंदर शुभेच्छापत्रं सध्या तो एका ठीकाणी
ठेवतो..... त्याची पत्नी दररोज सायंकाळी त्याच ठीकाणी एका कोप-यात पणती लावते..... काही दिवसांपूर्वी त्याचा एक भाऊ घरी
आला व त्याने हे
सर्व पाहील्यावर जे काही सांगितले
तो विचार / दृष्टीकोन दोघांच्या मनात कधीच आला नव्हता व ती उभयतांही अचंबित झाली..... अंगावर काटा आला.... त्याचे खूप आभार मानले....
तो
प्रसंग म्हणजे मामाने गेल्यावर्षी दिलेले आजोळच्या घराचे शुभेच्छापत्र.... त्यादिवशी ती पणती या
शुभेच्छा पत्रासमोर होती.... भाऊ पटकन
म्हणाला वहीनी तुम्ही तर सावंतवाडीच्या औदुंबर
व तुळशी वृंदावन समोरच पणती लावली आहे.... इकडे लावली आणि तिकडे पोहोचली..... दोघं मिनीटभर नि:शब्द.... कारण
त्याचे आणि औदुंबराचे लहानपणापासून दृढ संबंध आहेत. आजोळी लहानपणी तो रहायला असताना
एका रात्री औदुंबर वृक्ष घरावर कलंडला होता... पण घरातील कोणासही
ईजा झाली नव्हती.... घरावरची थोडीफार कौलच काय ती फुटली होती....
नंतर कालांतराने हळुहळु तो औदुंबर पूर्ववत
होत गेला.....
वर्षातून कमीतकमी ३/४ वेळा मिळेल ते कारण शोधून गावाकडे पर्यायाने आजोळीपण जाणारा तो गेल्या १६ महीन्यात फक्त २/३ तासांसाठीच जाऊन आल्याने भावाने दिलेल्या या दृष्टीकोनामुळे त्याचा निरुत्साह नष्ट झाला.... तो नतमस्तक झाला...... याला काय म्हणायचे हे लक्षात येईना.... म्हणून ही अंधश्रध्देवरील श्रध्दा.....
उन्मेष....
By
Unmesh R. More
unmeshmore@gmail.com
Comments
Post a Comment
Do leave your comment.